सोमवारी महामृत्युंजय जप करणे आरोग्यासाठी फायदेशीर

सोमवार, 9 डिसेंबर 2024 (06:58 IST)
सोमवारी महादेवाची पूजा अर्चना केली जाते. भक्त आपल्या इच्छापूर्तीसाठी सोमवारी विशेष रुपात शिव शंकराची आराधना करतात. या दिवशी काही मंत्रांचे जप करुन देखील महादेवांना प्रसन्न करता येतं. जाणून घ्या ते मंत्र ज्याने आपली इच्छा पूर्ण होईल-
 
धार्मिक ग्रंथांमध्ये लिहिले आहे की - कलियुग नाम अधारा! सुमिर सुमिर नर उताराहि ही पारा!!
अर्थात कलयुगात देवाची पूजा करण्यासाठी वेळ काढता येत नसेल तर केवळ नाम मात्राने अर्थात नामजप केल्याने देवाची प्राप्ती संभव आहे. याने मनोरथ देखील सिद्ध होतात.
 
शिव पंचाक्षर मंत्र
ॐ नम: शिवाय
या मंत्राचा जप स्फटिक माळीने केल्याने तन-मन शुद्ध होतं.
 
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र: प्रचोदयात
याने संपूर्ण कुटुंबाचं कल्याण होतं. हे मंत्र रोज जपता येऊ शकतं.
 
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्‌। उर्वारुकमिव बन्धनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात्‌॥
असे म्हणतात की या मंत्राचा जप करुन कृपाचार्यांनी मृत्यूवर विजय प्राप्त केली होती. म्हणून हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. दु:ख, संकट, आजार अशा वेळी महामृत्युंजय मंत्र जप केल्याने फायदा होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती