देवघरात ठेवा या 20 पवित्र वस्तू, तेव्हाच होईल आपले कल्याण
शुक्रवार, 3 जुलै 2020 (08:39 IST)
घरी किंवा देऊळात पूजा करण्यासाठी काही विशेष साहित्य असणं गरजेचं असतं. या सर्व साहित्याला एकत्र करूनच पूजा करतात. जरी साहित्य भरपूर असले तरी इथे आम्ही आपल्याला पुजायचे 20 उपासना चिन्हे सांगत आहोत.
1 शाळिग्राम : विष्णूंची एका प्रकाराची मूर्ती जी बहुतेकदा दगडाच्या गोळ्या किंवा गोट्यांच्या स्वरूपात असतात. त्यावर चक्राचे (मंडळाचे) चित्र असतं. ज्या दगडावर हे चिन्ह नसतं ते पूजनासाठी योग्य मानले जात नाही. हे सर्व प्रकारांच्या मूर्तीपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि फक्त याच मूर्तीच्या पूजेचा नियम आहे.
2 शिवलिंग : शंकराची एक प्रकाराची मूर्ती जी वर्तुळाकार जानवं घातलेली असते. यालाच शिवलिंग म्हणतात म्हणजे शिवाचा प्रकाश. ही सर्व मूर्तींपेक्षा अधिक प्रभावी असून हीच पूजेसाठी योग्य मानली गेली आहे. शाळिग्राम आणि शिवलिंग घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व प्रकाराने शुभ असतं.
3 आचमन : लहान तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी भरून त्यात तुळस टाकून पूजेचा स्थळी ठेवतात. ह्याला आचमनाचे पाणी म्हणतात. ह्याला तीन वेळा ग्रहण करतात. अशी आख्यायिका आहे की अश्या पद्धतीने आचमन केल्याने पूजेचे परिणाम दुपटीने मिळतात.
4 पंचामृत : पंचामृत म्हणजे पाच प्रकारचं अमृत. दूध, दही, मध, तूप आणि शुद्ध पाण्याच्या या मिश्रणाला पंचामृत म्हणतात. काही विद्वान दूध, दही, मध, तूप आणि उसाच्या रसापासून बनवलेल्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात तर काही जण दूध, दही, तूप, साखर, मध या पासून पंचामृत बनवतात. मधुपर्का मध्ये तूप नसतं. या संमिश्रणात रोग प्रतिबंधक गुणधर्म असतात. हे पुष्टिकारक आहे.
5 चंदन (अष्टगंध) : चंदन शांतते आणि शीतलतेचे प्रतीक आहे. एका चंदनाची खोड आणि सहाण पूजेच्या ठिकाणी असावं. चंदनाच्या सुवासाने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात. चंदनाला शाळिग्राम किंवा शिवलिंगावर लावतात. कपाळी गंध लावल्याने मेंदू शांत राहतं.
6 अक्षता : जास्त श्रमातून मिळालेल्या समृद्धीचे प्रतीक असतात तांदूळ (अक्षता). अक्षता अर्पण करण्याच्या मागील अर्थ असा आहे की आपल्या वैभवाचे उपयोग स्वतःसाठी नव्हे तर मानवाची सेवा करण्यासाठी करावं.
7 फुले : देव किंवा देवीच्या चरणी फुले अर्पण करतात. हे सौंदर्य बहरविण्यासाठी असतं. ह्याचा अर्थ असा असतो की आपण घरातून आणि बाहेरून सुंदर बनावं.
8 नैवेद्य : नैवेद्यात गोडवा असतो. आपल्या जीवनात देखील गोडवा असणं महत्त्वच आहे. देवी आणि देवांना नैवेद्य दिल्याने आपल्या जीवनात गोडवा, सरळता आणि सौम्यता बनून राहील. फळ, मिठाई, मावा, आणि पंचामृतासह नैवेद्य दाखवतात.
9 रोली (रोळी) : चुन्यापासून लाल पूड आणि हळद मिसळून बनवली जाते. ह्याला कुंकुम देखील म्हणतात. हे दररोज लावत नाही. प्रत्येक पूजामध्ये हे तांदुळाबरोबर कपाळी लावतात. हे शुभ असतं. हे आरोग्यास चांगलं करतं. हे रक्त वर्ण धैर्याचे प्रतीक आहे. रोळी कपाळी खाल पासून वरपर्यंत लावल्याने आपल्या गुणांमध्ये वाढ करण्याची प्रेरणा देतात.
10 धूप : धूप सुवासाला वाढवते. सुवास आपल्या मन आणि मेंदूत सकारात्मक भाव आणि विचारांना निर्मित करतं. यामुळे आपल्या मन आणि घराचे वातावरण शुद्ध आणि सुवासिक बनतं. सुवासाचे जीवनात खूप महत्त्व असतं. धूप म्हणजे उदबत्ती नाही. घरात उदबत्तीच्या ऐवजी धूप जाळावं. धूप जाळण्यासाठी एक विशिष्ट पात्र येत.
11 दिवा : पारंपरिक दिवा मातीचा असतो. यामध्ये पाच तत्त्व असतात. माती, आकाश, पाणी, अग्नी आणि हवा. असे म्हणतात की या पाच घटकापासूनच विश्व बनलं आहेत. म्हणूनच प्रत्येक हिंदू विधींमध्ये या पंचतत्त्वं असणं अनिवार्य आहेत.
12 गरूड घंटाळी : ज्या ठिकाणी घंटाळ्याची आवाज नेहमीच येते, त्या ठिकाणी वातावरण नेहमीच शुद्ध आणि पावित्र्य राहतं. या मुळे नकारात्मक शक्ती दूर होते. नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे भरभराट होते. गरूड घंटा पूजेच्या स्थळी ठेवतात.
13 शंख : ज्या घरामध्ये शंख ठेवतात तेथे लक्ष्मी नांदते. शंख हे सूर्य आणि चंद्र देवा सम आहे. ह्याचा मध्यभागी वरुण, मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आणि सरस्वती नद्या आहेत. आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात तेच लाभ आपल्याला शंखाच्या दर्शन आणि पूजा केल्याने मिळतात.
14 पाण्याचा तांब्या : पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्या देवांचे आसन मानले गेले आहेत. खरं तर आपण पाण्याला शुद्ध घटक मानतो, ज्यामुळे देव आकर्षित होतात. ह्याला मंगल कलश देखील म्हटलं जातं. एका कास्य किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे पान टाकून वर नारळ ठेवतात. कलशावर किंवा तांब्यावर रोलीने स्वस्तिक बनवून त्याचा गळ्याचा भोवती मौळी (एका प्रकाराची दोरी/नाडा) बांधला जातो. तांब्यामध्ये पान आणि सुपारी घालतात.
15 कवडी : प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहे हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलेले आहेत. एक- एक पिवळ्या कवडीला वेग वेगळ्या लाल कापड्यामध्ये बांधून घराच्या तिजोरीमध्ये आणि आपल्या खिशात ठेवल्याने भरभराट होते.
16 तांब्याचं नाणं : तांब्यामध्ये सात्त्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा जास्त असते. कलशातील उठणाऱ्या लाट्या वातावरणात मिसळतात. तांब्यामध्ये पैसे टाकल्यास, घरात शांतता आणि समृद्धीची भरभराट होते. जरी हे उपाय दिसायला लहान असले तरीही यांचा प्रभाव प्रचंड आहे.
17 पाट : एक असा पाट ज्यावर सर्व साहित्य ठेवले जातात. लोकं सिंहासनासारखे पाट बनवून घेतात. सध्या बाजारपेठेत बांधलेले देऊळ देखील मिळतात ज्याचा मध्ये हे सर्व पूजेचे साहित्य ठेवता येतात. पण देऊळ आणि मूर्ती घरात असावे किंवा असू नये हे कोणत्याही लालकिताब तज्ज्ञांना विचारूनच ठेवावं. पाटावर पांढरा, पिवळा किंवा लाल कापड अंथरुणंच हे सर्व साहित्य ठेवतात.
18 दुर्गेची मूर्ती : देवी दुर्गेची सोन्याची, तांब्याची किंवा चांदीची मूर्ती ठेवावी. हे मिळत नसल्यास, मातीची मूर्ती आवर्जून ठेवावी. पण मूर्तीचा आकार जास्त मोठा नसावा. नवरात्रामध्ये दुर्गेची पूजा करतात त्यामुळे देवी आईची मूर्ती घरात असावी.
19 गंगेचं पाणी : तांब्याच्या एका फार लहान तांब्यामध्ये गंगेचं पाणी भरून ठेवावं. कित्येकदा आपल्याला या गंगेच्या पाण्याची गरज पडते. गंगेच्या पाण्याचा तांब्या देखील पाण्याच्या तांब्यासारखं ठेवावं.
20 इतर साहित्य : हळकुंड, जानवं, बाळकृष्ण, गणेशाची लहान पितळ्याची मूर्ती, कापूर, अत्तराची बाटली, चांदीचं नाणं, नाडी/दोरी (लच्छा), मध, वेलची (लहान), लवंग, धणे, दूर्वा, रुद्राक्ष आणि स्फटिकांची माळ आणि पूजेचे साहित्य.