त्या मागील आख्यायिका अशी आहे की, जेव्हा मारुती त्याचे गुरू सूर्याकडून विद्या शिकत होते तेव्हा 9 विद्यांपैकी 5 विद्या शिकवल्यावर इतर 4 विद्या शिकण्यासाठी विवाहीत असणे गरजेचे होते. त्यासाठी तशी अटच होती. आजीवन ब्रह्मचारी राहाण्याचे व्रत घेतलेल्या मारुतीला यामुळे बैचेनी होऊ लागली. मारुतीची मनस्थितीत पाहून सूर्यदेवांनी हनुमंताला स्वत:च्या मुलीशी विवाहाचा प्रस्ताव ठेवला.
सूर्यदेवांची मुलगी सुवर्चला तपस्विनी होती. ज्येष्ठ शुद्ध दशमी, भानू वासरे, रविवार, उत्तरा नक्षत्र, युक्ताशिमा लग्न” हा शुभ मुहूर्त बृहस्पतींनी काढला. ३२ करोड देवांच्या समक्ष सुवर्चला हनुमान यांचे लग्न झाले. भगवान सूर्या देवांनी हनुमंताचे पद प्रक्षालन केले आणि त्यांना आपल्या मुलीशी लग्न करण्याची विनंती केली. आणि मग अशा रीतीने हा सुंदर विवाह संपन्न झाला.
सुवर्चला सहित हनुमानाचे मंदिर भारतात 4-5 ठिकाणी आहे. त्यातले एक हे तेलांगणाच्या खम्माम या ठिकाणी विवाहीत जोडप्याने येऊन त्या सपत्निक मारुतीचे दर्शन घेतले, तर त्या दांपत्यामध्ये प्रेम, सुख-शांती नांदते, अशी धारणा आहे. येल्लांडू गावात हे मंदिर आहे. या शिवाय अजून काही मंदिर सिकंदराबाद, गुंटूर, राजामुण्ड्रि इतर ठिकाणी आहेत.