ज्ञानमाता-मंदिराला-वीट मी देईन म्हणतो। वीट मी होईन म्हणतो।।धृ।।
पसरला अंधार नगरी, तेजाळले आम्हास त्यांनी। संस्कृती संस्कार करूनी, घडविले आम्हास त्यांनी। सागरी त्यांच्या स्मृतीच्या - मनसोक्त मी पोहीन म्हणतो।। अर्घ्य मी अर्पिन म्हणतो।।1।।
त्या जरी येथून गेल्या, हृदयात अन् प्राणात वसती। गंधापरी वाहती फुलांच्या, जागेपणी स्वप्नात दिसी। फूल श्रद्धेचे तयांच्या - चरणावरी वाहीन म्हणतो।। उतराई मी होईन म्हणतो।।2।।
अजुनी घुमती शब्द त्यांचे, ज्ञानियाच्या मुलुखातुनी। अमृताची धार अमजुनी, अश्रूत मिळते लोचनी। भावल्या मूर्तिपुढे त्या - आरती मी गाईन म्हणतो।। तल्लीन मी होईन म्हणतो।।3।।