हॉटेलमध्ये आग; ममता बनर्जी थोडक्यात बचावल्या

शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (10:34 IST)
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी गुरुवारी सायंकाळी एका दुर्घटनेत थोडक्यात बचावल्या. ममता बॅनर्जी मालदा जिल्ह्यात प्रचारासाठी आल्या असता एका खासगी हॉटेलमध्ये थांबल्या होत्या. ममताच्या खोलीत अचानक आग लागली. सुदैवाने सुरक्षारक्षकांनी ममतांना सुरक्षित बाहेर काढल्याची माहिती तृणमूल कॉंग्रेस सूत्रांनी दिली.

ममता बॅनर्जी मालदा जिल्ह्यात एका प्रचारसभेत संबोधित करण्यासाठी आल्या होत्या. आरामासाठी त्या एका खासगी हॉटेलमध्ये थांबल्या असता. त्यांच्या खोलीत अचानक आग लागली.

राज्याचे पर्यटन मंत्री कृष्नेंदू नारायण यांनी सांगितले, की हॉटेलमधील खोलीतील एसीमधून धूर बाहेर निघत होता. त्यानंतर वायर्स जळल्या. ही बाब सुरक्षारक्षकांच्या लक्षात येतात त्यांनी ममतांना सुखरूप बाहेर काढले. 

वेबदुनिया वर वाचा