मनमोहन सिंग यांना जयस्वालांकडून घरचा आहेर

बुधवार, 23 एप्रिल 2014 (16:08 IST)
देशाचे विद्यमान पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना आघाडीचे राजकारण कळत नसल्याची टीका केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांनी  त्यांना घरचा आहेर दिला आहे. जयस्वाल कानपूरमधून कॉंग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

डॉ. सिंग यांना आघाडीचे राजकारण कळत नसल्याचे परिणाम यूपीए सरकारला भोगायला लागले असल्याचेही जयस्वाल म्हणाले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्याने थेट पंतप्रधानांवर जाहीरपणे टीका केल्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे.    

वेबदुनिया वर वाचा