ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना धमकी

शुक्रवार, 18 एप्रिल 2014 (10:16 IST)
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंना एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवरून धमकी दिल्याने  मोठी खळबळ उडाली आहे. 'मी उस्मानाबादमधील असून राष्ट्रवादी काँग्रेसा कार्यकर्ता आहे. आपला उमेदवार पडला तर तुम्हाला बघून घेऊ', अशा शब्दात अण्णांना दिली. पारनेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीने उस्मानाबादमधून डॉ. पद्मसिंह पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात अण्णा जाहीर प्रचार करत आहेत. संसदेच्या पवित्र मंदिरात भ्रष्ट आणि अपवित्र लोक जाऊ नयेत, यासाठी अण्णा हजारे यांचे हे मतदार जागृती आंदोलन सुरु केले आहे. अण्णांना मिळालेल्या धमकी मागे पद्मसिंह पाटील यांचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे

वेबदुनिया वर वाचा