जगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर

सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:08 IST)
केवळ भारतातच नाही तर जगात अनेक ठिकाणी बुद्धीची देवता, विघ्नहर्ता गणेश पुजला जातो. भारतात आता गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरु झाली आहे. जगात जेवढी म्हणून गणेश मंदिरे आहेत तेथे गणेश हा गजमुख आहे. तमिळनाडूतील एक मंदिर मात्र याला अपवाद असून येथे गणेश मानवी चेहरा असलेला आहे. तीलतर्पणपुरी या तमिळनाडूतील कुतनूर गावापासून दोन किमी अंतरावर हे मंदिर असून त्याला आदिविनायक मंदिर असे म्हणतात. हे मंदिर फार मोठे नाही. मात्र त्याचे आणखी एक विशेष म्हणजे येथे भाविक पितरांना शांती मिळावी म्हणून पूजा करतात. मानवी चेहरा असलेली ही मूर्ती जगात एकमेव आहे. असे सांगतात या ठिकाणी श्रीरामाने त्यांच्या पूर्वजांना शांती मिळावी म्हणून पूजा केली होती. तीलतर्पण या नावामागे हाच अर्थ आहे. तीलतर्पण म्हणजे पूर्वजांना समर्पित. पुरी म्हणजे नगर. याच आवारात एक महादेव आणि सरस्वती मंदिरही आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती