स्त्रिया का नाही फोडत नारळ?

women not allowed to break coconuts हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्‍याही देव-देवतांची पूजा नारळाविना अपूर्ण मानली जाते. असे मानले जाते की नारळ चढवल्याने धनसंबंधी समस्या दूर होते. पण आपण नेहमी मंदिराचे पंडित किंवा घरातील पुरुषांनाच नारळ फोडताना बघितले असतील. कारण हिंदू धर्मात स्त्रियांना नारळ फोडण्याचा हक्क मिळालेला नाही. शास्‍त्रामध्‍ये स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ असल्याचे सांगितले आहे.
 
हे ऐकून आश्चर्य वाटणे साहजिक आहे की यामागे काय कारण आहे ज्यासाठी स्त्रियांना या कामापासून वंचित करण्यात आले असावे. यामागे एक कथा अशी आहे की ब्रह्म ऋषी विश्वामित्र यांनी विश्‍व निर्मित करण्यापूर्वी नारळ निर्मित केले होते. याला मानवाचा प्रतीरूप मानले आहे. नारळ हे बीजरूपी असल्यामुळे प्रजनन क्षमतेशी जुळलेले आहे. स्त्रिया बीजरुपात बाळाला जन्माला घालते म्हणून स्त्रियांनी नारळ फोडणे अशुभ मानले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती