हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

हरितालिका व्रत सर्वात श्रेष्ठ व्रत आहे. कुमारिका मनपसंत जीवनसाथीदार मिळवा तर सुवासिनी नवर्‍याच्या दीर्घायुष्यासाठी हरितालिका हे व्रत करतात. हे व्रत कसे करायचे याची पूजा विधी तर माहीत असेलच परंतू या व्रताचे काही नियम आहे हे पाळणे आवश्यक आहे तरच व्रताचे फळ मिळतं. तर येथे आज आपण जाणून घ्या असे 5 काम जी हरितालिका व्रत दरम्यान चुकून करू नये.
 
राग करू नये
व्रत करणार्‍यांना स्त्रियांनी क्रोध करू नये. स्त्रिया हाताला मेंदी लावतात त्यामागे क्रोधावर ताबा असला पाहिजे हे ही एक कारण आहे.
 
झोपू नये
तसेही कोणत्याही व्रताच्या दिवशी दिवसा झोपणे चुकीचे आहे तसेच हरितालिकेला जागरण करण्याची पद्धत आहे म्हणून व्रत ठेवणार्‍या स्त्रियांनी रात्री झोपू नये. जागरण करून भजन कीर्तन किंवा काही मनोरंजक खेळ खेळत जागरण करावे.
 
अपमान करू नये
चुकून ही घरातील वडीलधार्‍यांना अपशब्द बोलू नये. त्यांचा अपमान करू नये याने व्रताचे फळ मिळत नाही. तसेही पूजे पूर्वी वडीलधार्‍यांच्या आशीर्वाद घेऊन पूजा केली जाते. अशात त्यांचा अपमान मुळीच करू नये.
 
अन्न खाऊ नये
हरितालिका हे व्रत निर्जल केलं जातं. या कडक उपवासात अनेक स्त्रिया पाणी देखील पित नाही अशात अन्न ग्रहण करणे अत्यंत चुकीचे ठरेल. काही कारणास्तव उपाशी पोटी राहणे शक्य नसल्यास फलाहार करता येऊ शकतो परंतू अन्न खाऊ नये.
 
नवर्‍याशी भांडू नये
ज्या पतीसाठी व्रत करत आहात त्याला नाखूश करून फळ कसे प्राप्त होईल. म्हणून निदान या दिवशी तरी वाद होण्याची स्थिती टाळावी. क्लेश, भांडण होतील अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती