शुभ आणि मंगलमयी असतात पंचमुखी गणेश

पाच मुख असणारे गणेशाला पंचमुखी गणेश म्हटले जाते.  पंचाचा अर्थ आहे पाच. मुखीचा अर्थ आहे तोंड. हे पाच पाच कोशाचे देखील प्रतीक आहे.  
 
वेदात सृष्टीची उत्पत्ती, विकास, विध्वंस आणि आत्मेच्या गतीला पंचकोशच्या माध्यमाने समजवण्यात आले आहे. या पंचकोशाला पाच प्रकारचे शरीर म्हटले आहे.  
 
पाहिला कोश आहे अन्नमय कोश-संपूर्ण जड जगत जसे पृथ्वी, तारे, ग्रह, नक्षत्र इत्यादी या सर्वांना अन्नमय कोश म्हणतात.  
 
दुसरा कोश आहे प्राणमय कोश-जडामध्ये प्राण आल्याने वायू तत्त्व हळू हळू जागा होतो आणि त्याने बर्‍याच प्रकारचे जीव प्रकट होतात. हेच प्राणमय कोश असतो.   
 
तिसरा कोश आहे मनोमय कोश-प्राण्यांमध्ये मन जागृत होत आणि ज्याचे मन जास्त जागृत होत तोच मनुष्य बनतो.  
चवथा कोश आहे विज्ञानमय कोश-सांसारिक माया भ्रमाचा ज्ञान ज्याला प्राप्त होणे. सत्याच्या मार्गावर चालणारी बोधी विज्ञानमय कोशामध्ये येते. हे विवेकी मनुष्याला तेव्हाच अनुभूत होतो जेव्हा तो बुद्धीपार जातो.   
 
पाचवा कोश आहे आनंदमय कोश-असे म्हटले जाते की या कोशाचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर मानव समाधी युक्त अतिमानव होऊन जातो. जो मानव या पाच कोशांनी मुक्त होतात, त्यांना मुक्त मानले जाते आणि ते ब्रह्मलीन होऊन जातात. गणपतीचे पाच मुख सृष्टीच्या या पाच रूपांचे प्रतीक आहे.  
 
पंच मुखी गणेश चार दिशा आणि एक ब्रह्मांडाचे प्रतीक देखील मानले गेले आहे म्हणून ते चारी दिशांची रक्षा करतात. ते पाच तत्त्वांची रक्षा करतात. घरात यांना उत्तर किंवा पूर्व दिशेत ठेवणे मंगलकारी असते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती