दररोज गणपतीची मूर्ती स्वच्छ करण्यासाठी कपड्याऐवजी ब्रश वापरणे अधिक सोयीस्कर जाईल. याने डोळे, नाक, बोटं, पगडी इतर जागेची व्यवस्थित स्वच्छता होऊ शकेल.
गणपतीची आवड दूर्वा, शमी पत्र व शमी पुष्प, बेलाचे पान, मंदार पुष्प, आर्क पुष्प, कमळ पुष्प.
घरात कोणताही पदार्थ बनल्यावर आधी गणपतीला नैवेद्य दाखवावा.
घरात गणपती विराजमान असल्यास त्यांना घरात एकटे सोडून जाऊ नये.
या दरम्यान हिंसा, वाद, संभोग, क्रोध, खोटे बोलणे, निंदा अश्या वाईट सवयींपासून दूर राहावे.