सुख-समृद्धी, भरभराटी आणतो पार्‍याचा गणपती

पारा पवित्र धातू असून हा ईश्वरीय धातू म्हणून ही ओळखला जातो. म्हणूनच प्राचीन धर्मग्रंथांप्रमाणे पार्‍याने तयार केलेल्या प्रतिमाचे पूजन केले जातात. देवाला या रूपात पुजल्याने घरात सुख-समृद्धी नांदते.
 
असे म्हणतात की पार्‍याचा गणपती आपली प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. जिथे याची पूजा होते तिथे सदैव सुख-शांती आणि समृद्धी येते. आणि अश्या भक्तांच्या घरात दारिद्र्य नष्ट होऊन भरभराटी येते.
जाणून घ्या याचे वैशिष्ट्य...

पार्‍याचा गणपती प्रतिष्ठित केल्यास रिद्धि-सिद्धी अर्थात धन आणि बुद्धीची प्राप्ती होते.
 
बुधवारी पार्‍याचा गणपती आपल्या दुकानात किंवा गोडाउनमध्ये स्थापित केल्यास भरभराटी येते.
 
पार्‍याच्या गणपतीची पूजा केल्याने दारिद्र्य दूर होतं.
 
पार्‍याच्या गणपतीची नियमित पूजा केल्याने विद्यार्थ्यांना यश लाभतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती