चिंचपोकळीचे चिंतामणी

राज्यभरात बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू आहे. कारण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षांपासून सगळे सण उत्सव घरातल्या घरातच साजरे करावे लागत होते. मात्र यंदा सणांचा उत्साह जोरदार दिसून येत आहे. मुंबईमध्ये मोठ्या धुमधडक्यात यंदा गणेशोत्सव साजरा होत आहे. 
 
चिंचपोकळीच्या चिंतामणी गणेशोत्सव मंडळ गिरणगावातील सर्वात जुन्या गणेशोत्सव मंडळापैकी एक आहे. अलीकडेच याचा आगमन सोहळा मोठ्या उत्साहाने पार पडला. 
 
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा आगमन सोहळ्यात मुंबईत मुंबईकरांनी मोठी गर्दी केली होती. बाप्पाच्या मूर्तीची एकूण उंची 20 फुटाची असून मुख्य मूर्तीची उंची ही 12 फुटाची आहे. यावर्षी यक्षिणी देवीच्या दरबारातील मूर्ती साकारण्यात आली आहे.
मूर्तिकार रेशमा खातू यांच्या भायखळ्यातील मूर्ती कारखान्यातून ही मूर्ती घडवण्यात आली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती