मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, प्रवाशांचे हाल

शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (15:24 IST)
मुंबई -  पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. अमृतांजन पुलाजवळ अपघात झाल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर एक्स्प्रेस वेवर प्रचंड रांगा लागल्या आहेत. घाटात अपघात झाल्यामुळे वाहनांच्या दीड ते दोन किमी रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्या, विकेंड, गणपतीसाठी पुणे कराड कोल्हापूरमार्गे कोकणात निघालेले चाकरमानी यामुळे वाहनांची संख्या आधीच जास्त आहे. त्यातच अपघात झाल्यामुळे प्रचंड कोंडीचा सामना करावा लागतोय.
 
दुसरीकडे मुंबईत रविवारी  मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर  मेगाब्लॉक नसणार आहे. गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी येत्या रविवारी भाविक मोठ्या संख्येने बाजारपेठांमध्ये जाणार आहेत. त्यामुळे हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आलाय. मात्र हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे.
 
ठाणे इथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाशी, नेरूळ, पनवेलसाठी आणि तिथून पुन्हा ठाणे करिता सुटणा-या अप मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणारेय. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी, वांद्रे हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती