गणपतीच्या मुर्तीचे विसर्जन कसे करावे? जाणून घ्या विधी

परंपरेनुसार अनंत चतुर्दशीला गणेशाच्या मुर्तीचे विसर्जन केले जाईल. जाणून घ्या विसर्जन विधीची योग्य पद्धत
 
1. गणेश पूजन केल्यानंतर हवन करावे आणि मग स्वस्तिवाचन पाठ करावं.
 
2. लाकडीच्या पाटावर स्वस्तिक आखून अक्षता ठेवाव्या, पिवळा कापड पसरवून चारी कोपर्‍यावर सुपार्‍या ठेवाव्या.
 
3. आता ज्या जागी मूर्ती ठेवली होती तेथून उचलून जयघोषसह मूर्ती पाटावर विराजित करावी.
 
4. विराजित केल्यानंतर गणपतीसमोर फळं, फुलं, वस्त्र आणि मोदक ठेवावे.
 
5. एकदा पुन्हा आरती करावी आणि त्यांना नैवेद्य दाखवावा आणि नवीन वस्त्र घालावे.
 
6. आता रेशमी वस्त्रात फळं, फुल, मोदक, सुपारी याची पोटली बांधून गणपतीजवळ ठेवावी.
 
7. आता दोन्ही हात जोडून गणपतीला प्रार्थना करावी. काही चुकलं असल्यास क्षमा मागावी.
 
8. जयकार करत पाटासकट त्यांची मूर्ती उचलून आपल्या डोक्या किंवा खांद्यावर ठेवावी आणि विसर्जन स्थळी न्यावी.
 
9. विसर्जन करताना कापुराती करावी आणि या मंत्राचा जप करावा-
 
10. श्री गणेश विसर्जन मंत्र 1
यान्तु देवगणा: सर्वे पूजामादाय मामकीम्।
इष्टकामसमृद्धयर्थं पुनर्अपि पुनरागमनाय च॥
 
11. श्री गणेश विसर्जन मंत्र 2
गच्छ गच्छ सुरश्रेष्ठ स्वस्थाने परमेश्वर।
मम पूजा गृहीत्मेवां पुनरागमनाय च॥
 
12. यानंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत निरोप द्यावा. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती