गणेश स्थापना कधी 18 की 19 सप्टेंबर, जाणून घ्या योग्य तारीख आणि शुभ मुहूर्त

गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (17:22 IST)
Ganesh Sthapana 2023 : गणेश चतुर्थी 2023 प्राणप्रतिष्ठा कधी करायची ganesh sthapana shubh muhurat 2023

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी हा दिवस गणेश चतुर्थी म्हणून साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यात चतुर्थीला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. 
 
गणेश स्थापना या तिथीबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. काही कॅलेंडरनुसार गणेश स्थापना सोमवार, 18 सप्टेंबर आणि इतर कॅलेंडरनुसार, मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी केली जाईल. नक्की तारीख आणि वेळ काय आहे हे जाणून घेऊ या-
 
गणेश चतुर्थी तिथी प्रारंभ:- 18 सप्टेंबर रोजी दुपारी 12:39 मिनिटांपासून सुरू होईल. 
गणेश चतुर्थी तिथी समाप्ती :- 19 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी 01:43 मिनटांवर समाप्त होईल. 
 
गणेश स्थापनेसाठी शुभ मुहूर्त :-
अशात श्री गणेश चतुर्थी उदयोतिथीनुसार 19 सप्टेंबरला साजरी केली जाईल.
श्री गणेशाची स्थापना करण्याचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 7 मिनिटांपासून ते दुपारी 1 वाजून 34 मिनिटांपर्यंत आहे.
या दिवशी मंगळवार असल्याने हा महाचतुर्थी म्हणून साजरा केला जाईल.
 
गणेश चतुर्थीला शुभ योग तयार होत आहे:-
1. हिंदी कॅलेंडरनुसार, मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 रोजी स्वाती नक्षत्र 19 सप्टेंबरच्या सकाळपासून दुपारी 01:48 पर्यंत राहील.
2. यानंतर विशाखा नक्षत्र सुरू होईल जे रात्रीपर्यंत चालेल. ही दोन्ही नक्षत्रे अतिशय शुभ मानली जातात.
3. वास्तविक स्वाती नक्षत्र, ध्वजा आणि त्यानंतर विशाखा नक्षत्रामुळे श्रीवत्स नावाचे दोन शुभ योग तयार होतील. यासोबतच या दिवशी वैधृती योगही असेल.
 
गणेश चतुर्थी तिथीला शुभ मुहूर्तावर घराच्या उत्तर, पूर्व किंवा ईशान्य भागात श्री गणेशाची स्थापना करा. आपल्या घरातील परंपरेनुसार दीड, तीन, पाच, सात, दहा जितके दिवस गणपती बसवतात तितके दिवस दररोज सकाळ संध्याकाळ 
 
गणपती बाप्पाची मनोभावे पूजा आणि आरती करावी. आणि बाप्पाला नैवेद्य दाखवावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती