गणेश मूर्ती विसर्जन दिवसभरात केव्हाही करा : दा कृ सोमण

मंगळवार, 1 सप्टेंबर 2020 (08:38 IST)
अनंत चतुर्दशी बरोबरच पौर्णिमा असल्याने सकाळी साडेनऊ वाजेपर्यंतच गणेश मुर्ती विसर्जनाचा मुहूर्त असल्याचा मेसेज सोशल मिडियात व्हायरल झाला आहे. मात्र, त्यात कुठलेही तथ्य नाही. मंगळवारी दिवसभरात केव्हाही गणेश मूर्ती विसर्जन करण्यास हरकत नाही, असे ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले आहे.
श्री गणेश विसर्जन : हे 2 मंत्र म्हणत देवाला निरोप द्या, मिळेल भरभरुन आशीर्वाद
श्री गणरायाला निरोप देण्याचा दिवस अनंत चतुर्दशी मंगळवारी आहे. गणेश विसर्जनाबाबत सध्या एक मेसेज प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात म्हटले आहे की, “मंगळवारी चतुर्दशी सकाळी ९:३९ पर्यंत आहे. त्यानंतर पौर्णिमा आहे. या दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्यामुळे गणेश विसर्जन करण्याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात आहेत. मंगळवारी ९:३९ पर्यंत चतुर्दशी असल्यामुळे तोपर्यंत आरती, नैवेद्य, उत्तरपूजा करून मूर्ती जागेवरून थोडी हलवावी. त्यानंतर दिवसभरात कधीही त्या मूर्तीचे विसर्जन करता येते.” यासंदर्भात ज्येष्ठ पंचांगकर्ते दा कृ सोमण म्हणाले की, पौर्णिमा ही सकाळी ९.३८ वाजता लागते आहे. सूर्योदय हा चतुर्दशीने होत आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभरात केव्हाही गणेश मूर्ती विसर्जन करण्यास हरकत नाही. तसेच, बुधवारी (२ सप्टेंबर) महालयारंभ म्हणजेच पितृपक्ष सुरू होतो आहे. त्यामुळे मंगळवारीच श्री गणेश मूर्तीचे विसर्जन करायला हवे, असेही सोमण यांनी स्पष्ट केले आहे.
गणेश विसर्जनाच्या दिवशी गणपतीला पाण्यातच विसर्जन का करतात, जाणून घेऊ या..
दरम्यान, मंगळवार हा श्री गणपतीचा वार असल्याने त्यादिवशी मूर्तीचे विसर्जन करावे का, असा प्रश्नही अनेकांकडून विचारला जात आहे. मात्र, अनंत चतुर्दशीचा दिवस असल्याने दिवसभरात केव्हाही गणेश मूर्तीचे विसर्जन करता येईल, असे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती