कृती-
सर्वात आधी सोललेली संत्री मिक्सरमध्ये टाका, आता दोन कप दूध घाला आणि बारीक करा. आता एका भांड्यात दूध ठेवा आणि ते चांगले उकळवा, जेव्हा दूध उकळेल तेव्हा त्यात केशर घाला. आता या उकळत्या दुधात संत्र्याचे आणि दुधाचे मिश्रण घाला. नंतर ते सतत उकळू द्या, आता त्यात साखर आणि वेलची पावडर घाला आणि चांगले मिसळा.त्यानंतर ते मंद आचेवर १५ ते २० मिनिटे शिजवा, आता काजू, बदाम, पिस्ता घाला. व २ मिनिटे शिजवा आणि नंतर ते एका भांड्यात काढा आणि वर सुकामेवा घाला. तयार खीर एका बाऊलमध्ये काढा. तर चला तयार आहे आपली आषाढी एकादशी विशेष नैवेद्याची खीर रेसिपी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.