वारकरी संप्रदाय म्हणतो, देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका

शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020 (09:06 IST)
राज्य सरकारने धार्मिक स्थळे उघडले तर विठुरायाच्या पायावरील दर्शन काही दिवस बंद ठेवले तरी चालेल, मात्र देवाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर टाकू नका असं वारकरी संप्रदायाने म्हटलं आहे. विठ्ठल मंदिर सुरु करण्यासाठी विश्व वारकरी सेना वंचितच्या मदतीने एक लाख वारकरी घेऊन विठ्ठल मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहे. 
 
इतर मंदिराच्या तुलनेने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात पायावर दर्शन असल्याने याबाबत वेगळा प्रश्न उभा राहणार आहे. एखादा कोरोनाग्रस्त भाविकाने पायावर दर्शन घेतल्यास त्यानंतर येणाऱ्या भाविकही कोरोनाची भीती राहू शकते. हे टाळण्यासाठी देवाच्या पायावर सॅनिटायझर फवारावे लागेल आणि यालाच वारकरी संप्रदायाने विरोध दर्शवला आहे.
 
कोरोनाचे संकट टाळण्यासाठी एकवेळ आम्ही कोरोनाची लस येईपर्यंत देवाचे मुखदर्शन घेऊ, पण पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारु नये, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती