श्री गजानन कवच

शनिवार, 15 फेब्रुवारी 2025 (16:44 IST)
गुणश्रया गुणातीता, शेगांवच्या गजानना ।
सर्वमंगल मांगल्या, गजानना संनिधी रहा ।।१।।
 
कला क्षण मूर्हर्तांकी, पक्ष मास ऋतुंतरी ।
बाल यौवन वार्धक्यी, गजानना संनिधी रहा ।।२।।
 
प्रात:काळी सकाळीही, मध्यान्ही, मध्यरात्रीला ।
सांजेला, सांजवातीला, गजानना संनिधी रहा ।।३।।
 
पूजीतो तुजला देवा, देऊळी वा मनोमनी ।
संतसंगती क्षेत्राला, गजानना संनिधी रहा ।।४।।
 
अंगणात घरी दारी, बैसता पंथी चालता ।
मार्ग आक्रमिता देवा, गजानना संनिधी रहा ।।५।।
 
संतांच्या संग वारिला, आषाढ घन वर्षता ।
रंगात नामघोषात, गजानना संनिधी रहा ।।६।।
 
कार्तिकी चांदरात्रीला, वैशाखीच्या उन्हामध्ये ।
वर्षात घन आषाढी, गजानना संनिधी रहा ।।।७।।
 
तू तिर्थ दर शेगांवी, अेकाकी भक्त मी इथे ।
मनमंदिरी येवोनी, गजानना संनिधी रहा ।।८।।
 
संसारी रमलो देवा, बाहण्यास तुला भुले।
आवाहन असो वा ना, गजानना संनिधी रहा ।।९।।
 
मद्मत्सर मोहाते, रोखितो मी परोपरी ।
द्यावया दृढ धैर्याते, गजानना संनिधी रहा ।।१०।।
 
गंकार नाद झंकारी, नामघोषात रंगतो।
नादसंधान साधेना, गजानना संनिधी रहा ।।११।।
 
निराकार गुणातीता, अस्तित्व तव न कळे।
नाद, गंध, रुप, स्पर्शे, गजानना संनिधी रहा ।।१२।।
 
मन्मनी करिता पूजा, उर्मी दुर्वा वहातसे।
रक्तगंधानुलिप्तांगा, गजानना संनिधी रहा ।।१३।।
 
मनमोहक नैवेद्या, भ्रूज्योती हिच आरती ।
प्रेमाश्रू जपती माला, गजानना संनिधी रहा ।।१४।।
 
विभक्त राहुनी भक्ता पूजे- अर्चेत रंगू दे।
देहभान नूरे तेव्हा, गजानना संनिधी रहा ।।१५।।
 
उधार उसनी काया पंचभूता समर्पिता ।
तोडिता पाश देहाचे, गजानना संनिधी रहा ।।१६।।
 
अंत:काळी अगा माझे, दोष पोटात घालूनी ।
विझता प्राण ज्योतीही, गजानना संनिधी रहा ।।१७।।
 
अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद भक्तप्रतिपालक शेगावनिवासी समर्थ सद्गुरू संत श्री गजानन महाराज की जय
ALSO READ: गजान महाराज आवाहन

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती