'गण गण गणांत बोते' हे भजन प्रिय सद्गुरूतें॥
या श्रेष्ठ गजानन गुरुतें । तुम्ही आठवित रहा यातें।
हे स्तोत्र नसे अमृत तें । मंत्राचि योग्यता यातें॥
हे संजीवनि आहे नुसतें । व्यावहारिक अर्थ न यातें।
मंत्राचि योग्यता कळते। जो खराच मांत्रिक त्यांतें।
पाठें दुःख ते हरतें। पाठका अति सुख होतें॥
हा खचित अनुग्रह केला । श्री गजानननें तुम्हांला।
घ्या साधुन अवघे याला। मनिं धरून भाव- भक्तीला।
कल्याण निरंतर होई। दुःख तें मुळीं नच राही ॥
असल्यास रोग तो जाई। वासना सर्व पुरतिलही।