2. हात जोडून पाठ करा “अचिंत्य जगता प्रती कृती तुझी ना कोणा कळे असो खलहि केवढा तव कृपे सुमार्गी वळे उणें, पुढति ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी शिरी सतत माझिया वरदहस्त ठेवा झणी“
3. आचमन प्रक्रिया- उजव्या हाताने थंड पाणी (3 वेळा) घ्या आणि “ओम केशवाय नम: ओम नारायणाय नम: ओम माधवाय नम:” चा उच्चार करत प्राशान करा. “ओम गोविंदाय नम:” म्हणत उजवीकडे पाणी घ्या आणि ताम्हणात टाकत दोनदा पुनरावृत्ती करा
4. हात जोडून “गुरू ब्रह्मा गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा,
गुरु साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः। म्हणा.
5. एक स्वच्छ थाळी घ्या, त्यात थोडे तांदळ घेऊन पादुका ठेवा.
6. तूपाचा दिवा लावा आणि महिलांनी हळद-कुंकु लावा.
7. पाच वेळा "ओम श्री गजाननय नमः" असे म्हणत पादुकेला दिवा ओवाळावा.
8. पाच वेळा "ओम श्री गजाननय नमः" असे म्हणत पादुकेला उदबत्ती दाखवा.
9. जोडप्यांना अभिषेक पत्र वाटून घेता येईल पण मुलांकडे स्वतःचे अभिषेक पत्र असावे.
10. तीन वेळा पादुकेवर चमच्याने गरम पाणी घाला ("ओम श्री गजाननय नमः" असे म्हणत).
11. एक फूल पाण्यात बुडवा आणि नंतर हळदीत, नंतर कुमकुममध्ये आणि काही अक्षता घ्या.
12. ते फूल चरण पादुकेला अर्पण करा.
13. तीन वेळा चमच्याने पादुकेवर गरम पाणी घाला ("ओम श्री गजाननय नमः" असे म्हणत).