मैत्र, म्हणजे थंडगार पाण्याचा शिडकाव असा

Webdunia
शनिवार, 5 ऑगस्ट 2023 (10:06 IST)
मैत्र, म्हणजे थंडगार पाण्याचा शिडकाव असा,
तजेलदार व्हायला, प्रत्येकाला अगदी वाटे हवासा,
आलेली मरगळ चुटकीसरशी जाते निघून,
मोकळा होतो माणूस त्यानं आपणहून,
नकोत कोणते वैद्य, नकोत कोणतीही मात्रा,
मित्रांच्या गराड्यात विवंचनेवर मिळतो उतारा,
तोडगा मिळतो तात्काळ  प्रत्येक समस्येवर ,
असावं मैत्रबन आजूबाजूला, फिर काहे का डर!! 
उडतात हास्याचे कारंजे अगदी वरचेवर,
थट्टा मस्करी चालत राहते, मजेत दिवसभर,
करू नका संकोच मंडळी, मारा हाक मित्राला,
धावत येईलच बघा तो,काय झालं हे विचारायला!! 
..अश्विनी थत्ते.

संबंधित माहिती

पुढील लेख