विदेशात शिक्षण घेण्याची सुविधा आता आपल्याला भारतातच उपलब्ध होत आहे. आणि यासाठी आपल्याला आता कोणतीही डिग्री मिळवण्याची गरज नाही, तुम्ही बारावी पास असाल तरी तुम्हाला ऑस्ट्रेलिया सरकारतर्फे नोंदणीकृत युनिफाईड पाथवे प्रोग्रॅम(एयूपीपी) अंतर्गत शिक्षणाची सुविधा मिळणार आहे. हे शिक्षण भारतीय खर्चातच विद्यार्थी पूर्णं करू शकतील.
या कार्यक्रमांअंतर्गत ऑस्ट्रेलियन सरकारच्या महत्त्वाच्या विद्यापीठांनी भारतीय महाविद्यालयात क्रेडिट ट्रान्स्फर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेअंतर्गत विद्यार्थ्यांकडे पासपोर्ट, व्हिसा, आयइएलटीएस, आणि कोणत्याही स्पर्धा परीक्षेशिवाय भारतातच शिक्षण सुरू करून ऑस्ट्रेलियात ते पूर्ण करू शकतात.
या कार्यक्रमांतर्गत माहिती तंत्रज्ञान, प्रोफेशनल अकाऊंटींग, इन्फॉर्मेशन सिस्टिम, बिझनेस मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स, हॉस्पिटली मॅनेजमेंट, बीबीए आदी तीन वर्षांचे कोर्सही आपण करू शकाल. एमटेक आणि एमबीए या पदवीसाठीही आपल्याला सरळ प्रवेश मिळू शकेल.