मुंबई पोलिसांचे शक्तीप्रदर्शन

वेबदुनिया

गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 (19:09 IST)
ND
ND
गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला मुंबईत झालेल्या हल्ल्याच्या वर्षपूर्ती दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी आज येथे संचलन केले आणि हल्ल्यात मृत व शहिद झालेल्यांप्रती श्रध्दांजली अर्पित केली.

मुंबई पोलीस दलाच्या विविध सशत्र दलांनी संचलन करुन मुख्यमंत्र्यांना मानवंदना दिली. यामध्ये एनएसजीच्या धर्तीवर स्थापन करण्यात आलेले फोर्स-१ पथक, अतिशिघ्र पोलीस पथक, बुलेट प्रुफ वाहने, कोम्बॅक्ट वाहने, मरीनक्रॉफ्ट, बॉम्ब शोधक व नाशक पथक, ३६० अंशातून फायरिंग करणारी बुलेट प्रुफ वाहने सहभागी झाले होते.

फोर्स-१ कमांडो पथकांनी यावेळी चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर केली. एअर इंडियाच्या इमारतीवरुन खाली उतरणे, एका इमारतीतून दुसर्‍या इमारतीत दोरखंडाच्या सहाय्याने जाऊन शत्रुचा कसा मुकाबला करतात याची राज्य पोलीस दलाने प्रात्यक्षिक सादर केली.

यानंतर हॉटेल ट्रायडंट कर्मचार्‍यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या शहीद स्मृतिस्तंभास मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पचक्र अर्पण करुन श्रध्दाजंली वाहिली.

वेबदुनिया वर वाचा