साहित्य : तीन लहान वाट्या वरई, एक लहान वाटी साबुदाणा, एक चमचा साखर, चवीनुसार मीठ.,
चटणीसाठी : एक वाटी खोवलेले ओले खोबरे, एक मिरची, चवीनुसार साखर, लिंबू, मीठ.
भाजीसाठी : तीन बटाटे उकडून, चमचाभर शेंगदाण्याचे कूट, मिरच्या बारीक चिरून, तेल, जिरे.
खोवलेले खोबरे, हिरवी मिरची मिक्सरमधून बारीक करावे. त्यात चवीनुसार साखर, मीठ व लिंबू घालून चटणी तयार करावी. भाजी करताना बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. भांड्यात तेल घालून त्यात जिऱ्याची फोडणी करावी. नंतर त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या घालून त्यात बटाटे व शेंगदाण्याचे कुट घालून भाजी तयार करावी. बटर, हिरवी चटणी आणि बटाट्याच्या भाजीबरोबर सर्व्ह करावेत.