कृती : सर्वप्रथम बटाट्यांना अर्धवट उकळावे व त्याची सालं काढून त्यांचा किस करून घ्यवा. नंतर त्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ व काळेमिरे पूड घालून मिश्रणाला एकजीव करावे. एक नॉन स्टिक पॅन गरम करून त्यात धिरड्यासारखे मिश्रण पसरावे व चारी बाजूने लोणी सोडून दोन्ही भाजूने परतून घ्यावे. सर्व्ह करताना वरून पनीर टाकावे व उपासाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.