ड्रायफ्रुट्स चिक्की

गुरूवार, 17 जुलै 2014 (12:43 IST)
साहित्य : एक वाजी काजू पावडर, पाऊण वाटी चिक्कीचा गूळ, प्रत्येकी पाव वाटी बदाम, पिस्ता काप व इतर ड्रायफ्रुट्स. 
 
कृती : काजू पावडर व चिक्कीचा गूळ चांगले एकत्र करावे. दूधाचा हात लावून छान मळून घ्यावे. त्याची पाहिजे त्या जाडीची काजू पावडर लावून पोळपाटावर पोळी लाटावी. त्यात ड्रायफ्रुट्सचे तुकडे घालावेत. परत हाताने गोळा करावा व हातानेच पोळपाटावर चौकोनी थापावा. वरून केशर टाकावे. हलके दाबावे. वड्या कापाव्यात. थोडा वेळ फ्रिजरमध्ये ठेवावे. पाच मिनिटांनी काढाव्यात.     
 

वेबदुनिया वर वाचा