जागतिक दूरसंचार दिन विशेष 2021 : जागतिक दूरसंचार दिन निबंध

सोमवार, 17 मे 2021 (09:00 IST)
वर्ल्ड टेलिकॉम डे' किंवा जागतिक दूरसंचार दिन दरवर्षी 17 मे 'ला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.आधुनिक युगात फोन, मोबाईल, इंटरनेट ही लोकांची पहिली गरज बनली आहे. या शिवाय जीवनाची कल्पना करणे अवघड आहे. वैयक्तिक जीवनापासून तर व्यावसायिक जीवनापर्यंत याचे खूप महत्त्व आहे. पूर्वी लोकांना एक मेकांशी संपर्क साधण्यासाठी खूप संघर्ष करावा लागायचा .आज इंटरनेट,मोबाईल मुळे हे सहज शक्य झाले आहे. आपण काही सेकंदातच आपल्या मित्रांशी ,कुटुंबियांशी, नातेवाईकांशी सहज बोलू शकतो आणि बघू देखील शकतो. हे दूरसंचार क्रांतीमुळे शक्य आहे. या मुळे भारताची गणना विकसनशील देशांमध्ये केली जाते. भारताची अर्थव्यवस्था या मुळे वेगाने वाढत आहे.  
 
याची सुरुवात 17 मे 1865 पासून सुरु झाली परंतु आधुनिक काळात याची सुरुवात 1969 पासून झाली तेव्हा पासून सम्पूर्ण जगभरात हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो. त्याच बरोबर नोव्हेंबर 2006 मध्ये तुर्की मध्ये पूर्ण झालेल्या परिषदेत जागतिक दूरसंचार आणि माहिती आणि सोसायटी हे तिन्ही एकत्रितपणे  साजरे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
* टेलीफोन भारतात सुरू- 
1880 मध्ये ओरिएंटल टेलिफोन कंपनी लिमिटेड 'आणि' अँग्लो-इंडियन टेलिफोन कंपनी लिमिटेड ने भारतात टेलिफोन एक्सचेंजची स्थापना करण्यासाठी भारत सरकारशी संपर्क साधला.टेलिफोन स्थापित करणे ही सरकारची मक्तेदारी आहे व सरकारच हे काम सुरू करेल या कारणावरून ही परवानगी नाकारली गेली. 1881 मध्ये सरकारने आपल्या निर्णयाच्या विरोधात जाऊन इंग्लॅण्डच्या ओरिएंटल कंपनी लिमिटेड ला कोलकाता,मुंबई,चेन्नई आणि अहमदाबाद मध्ये टेलिफोन एक्सचेन्ज सुरु करण्यासाठी लायसेन्स देण्यात आले. 1881 मध्ये देशात पहिली औपचारिक टेलिफोन देव स्थापन झाली. 28 जानेवारीभारताच्या टेलिफोन इतिहासामध्ये 'रेड लेटर डे' आहे. या दिवशी भारतीय परिषदेचे तत्कालीन गव्हर्नर जनरल मेजर ई. बेरिंग यांनी कोलकाता, चेन्नई आणि मुंबई येथे टेलिफोन एक्सचेंज सुरू करण्याची घोषणा केली. कोलकाता एक्सचेन्ज ला सेंट्रल एक्सचेन्ज असे नाव देण्यात आले. या सेंट्रल एक्सचेन्जचे सुमारे 93  ग्राहक होते. मुंबईत देखील 1882 मध्ये अशाच एका टेलिफोन एक्सचेन्ज चे उदघाटन करण्यात आले.
 
इंटरनेटचे महत्त्व-
सध्या दूरसंचारचा  एक महत्त्वाचा भाग इंटरनेट आहे. जे लोक या इंटरनेट चा एक भाग आहे त्यांच्या जीवनाला कलाटणी आली आहे. इंटरनेट ने त्या लोकांचे आयुष्य बदलून टाकले आहे. कोणतीही सूचना आपण काहीच सेकंदातच मिळवून घेतो. इंटरनेट हे सोशल नेटवर्किंग पासून ते स्टॉक  एक्सचेंज, बँकिंग, ई-शॉपिंग इत्यादीसाठी महत्त्वाचे आहे. या साठी सर्व श्रेय गुगल सारख्या सर्च इंजिनला दिले जावे. गुगल मुळे हजारो किलोमीटर दूर असलेली व्यक्ती चॅटिंग,व्हिडीओ,व्हॉइस चॅटिंग द्वारे काही सेकंदातच जवळ आलेली जाणवते आणि ही दुरी आता काहीच सेकंदावर कमी केली गेली आहे.   
 
ज्या प्रकारे इंटरनेट ने आपले जीवन सहज केले आहे तर आव्हाने देखील समोर आणून ठेवले आहे. आज इंटरनेटवरील काम कमी आहे आणि त्याचा अधिक गैरवापर केला जात आहे. पोर्नोग्राफीसारख्या समस्या इंटरनेटच्या प्रत्येक भागात पोहोचल्या आहेत.सायबर गुन्हेगारी, वाढतच आहे. या सर्व नकारात्मक गोष्टी असूनही, आज भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशांमध्ये टेलिकम्युनिकेशन तंत्रज्ञान समृद्धीसाठी उपयुक्त ठरत आहे.या क्षेत्रातील सतत होणाऱ्या बऱ्याच विकासाचा परिणाम म्हणून अनेक तरुण चांगले करिअरचे स्वप्न घेऊन या क्षेत्रात पुढे येत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती