Marathi Essay : माझा आवडता खेळ कबड्डी निबंध

बुधवार, 15 डिसेंबर 2021 (22:36 IST)
खेळणे आरोग्यासाठी खूपच उपयोगाचे असतात .खेळ कोणताही असो तो तंदुरुस्ती आणि ताजेपणा निर्माण करतात. क्रिकेट, टेनिस, फुटबॉल, हॉलिबॉल इत्यादी विदेश खेळ आहेत, या साठी साहित्याची आवश्यकता असते. शिवाय हे सारे खेळ महागडे आहे. पण कोणताही खर्च न करता खेळता येणारे खेळ म्हणजे कब्बडी, खो खो कुस्ती इत्यादी . माझा आवडता खेळ आहे कब्बडी .
हा खेळ खेळण्यासाठी जास्त जागेची गरज नसते. कमी जागेत देखील हा खेळ खेळता येतो. लहान मैदानात मधोमध रेषा ओढली जाते. खेळाडूंना दोन संघात विभागतात. प्रत्येक संघात 7 -7 खेळाडू असतात. दोन्ही संघ रेषेच्या बाजूने उभे राहतात. सर्वप्रथम कोणत्याही संघाचा एक खेळाडू श्वास धरून कबड्डी -कबड्डी म्हणत दुसऱ्या बाजूला जातो, विरुद्ध पक्षाचा खेळाडूंना स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. जर दुसऱ्या संघातील खेळाडूंनी त्याला धरले आणि त्याने श्वास सोडला तर तो बाद धरला जातो. पण कोणत्याही एक किंवा एकापेक्षा जास्त खेळाडूंना हात लावून रेषेच्या अलीकडे आपल्या पक्षात आला तर त्याने स्पर्श केलेले सर्व खेळाडू बाद होतात. 
इतिहास- 
हा खेळ जवळपास चार हजार वर्ष जुना आहे. कबड्डीचा उल्लेख महाभारतात पण केला गेला आहे. काही वर्षांपूर्वी कबड्डी फक्त पंजाब मध्ये खेळायचे नंतर आता हा खेळ भारतासह नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका इत्यादी देशात खेळला जातो. कबड्डीला भारतात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.  
हा खेळ खेळण्यासाठी ताकत आणि बौद्धिक चातुर्याची गरज असते.आज कबड्डी बांगलादेशचा राष्ट्रीय खेळ आहे. कबड्डीला आता आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सामील केले आहे, ज्यामुळे कबड्डी अधिकच लोकप्रिय होत आहे. आजकाल  महिला देखील कबड्डी खेळत आहेत. कबड्डी खेळ स्फूर्ती आणि शक्तीचा खेळ आहे.  
 
कसे खेळतात- 
कबड्डीचे खेळ दोन संघामध्ये खेळले जातात. प्रत्येक संघात 7-7 सदस्य असतात. कबड्डीच्या मैदानाचे माप जवळपास 13 मीटर लांब आणि 10 मीटर रुंद असते. या मैदानाला मध्यभागी रेष ओढून दोन भागात वाटले जाते. मैदानात प्रवेश केल्यानंतर टॉस केले जाते. टॉस जिंकणाऱ्या संघाचा एक खेळाडू श्वास धरून कबड्डी -कबड्डी म्हणत दुसऱ्या संघाच्या बाजूला जातो खेळाडूंना हात लावून बाद करायचे असते. जर खेळाडू दुसऱ्या टीमच्या भागात जाऊन कोणत्याही खेळाडूला हात लाऊन परत आपल्या भागात येतो. तर त्याला एक अंक मिळतो. आणि ज्या खेळाडूला हात लावला आहे त्या खेळाडूला काही वेळासाठी मैदानाच्या बाहेर जावे लागते. जर दुसऱ्या संघाच्या खेळाडूंनी हात लावून बाद करणाऱ्या या संघाच्या खेळाडूला पकडले, तर त्यांना अंक प्राप्त होतात आणि या संघाच्या खेळाडू ला बाहेर जावे लागते.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती