दिल्ली, राजस्थानात भाजपाला धक्का

मुंबईत झालेल्या हल्ल्यांनंतर या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बाजूने मतदारांचा कौल असेल अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असतानाच आतापर्यंत आलेल्या निकालांमध्ये या दोन राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला आहे.

सकाळपासूनच पाच राज्यांमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली असून, यात भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानात आणि कॉग्रेसची सत्ता असलेल्या दिल्लीत भारतीय जनता पार्टीच सत्तेवर येईल अशी आशा होती परंतु या दोनही राज्यांमध्ये भाजपला मोठा फटका बसला आहे.

राजस्थानात भाजपाला 50 ते 60 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. सध्या तरी या दोनही राज्यांमध्ये कॉग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत.

वेबदुनिया वर वाचा