कोजागिरी पौर्णिमा 2024 बदाम केशर दूध रेसिपी

बुधवार, 16 ऑक्टोबर 2024 (10:06 IST)
बदाम केशर दूध रेसिपी :शरद पौर्णिमा अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. याला रास पौर्णिमा, कोजागरी पौर्णिमा, आश्विनी पौर्णिमा किंवा कौमुदी व्रत असेही म्हणतात. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो. असे म्हटले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रातून निघणारी किरणे अमृतसारखी असतात, म्हणून या दिवशी लोक खीर किंवा दुध  तयार करतात आणि रात्री चंद्रप्रकाशात ठेवतात. चला तर मग बदाम केसर दूधची रेसिपी जाणून घेऊ या.
 
 
साहित्य -
दूध- 1 लीटर
साखर -1वाटी
बादाम- 1/2 वाटी
वेलची पूड 1 लहान चमचा
केशर - 10 ते 15  कांड्या 
सुकेमेवे- गार्निश करण्यासाठी 
केशर बादाम दूध बनवण्यासाठी बादाम एक तासापूर्वी भिजत घाला. नंतर त्याचे सालं काढून घ्या.
आता बादाम दुधासोबत वाटून घ्या. एका वाटीत कोमट दुधात केशर घालून ठेवा.
आता दूध मंद आचेवर उकळू द्या.दूध उकळत असताना त्या मध्ये वाटलेल्या बादामाची पेस्ट घाला.
 दूध चांगल्या प्रकारे उकळू लागल्यावर त्या मध्ये  साखर घाला.आता दुधात वेलची पूड आणि केशर मिसळलेलं दूध घाला.वरून सुकेमेवे घालून सजवा.गरम बदाम केशर दूध तयार दूध सर्व्ह करा. 
 
Edited by - Priya Dixit    

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती