Diwali Special Fraal Besan Karanji Recipe : बेसनाची करंजी

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (14:00 IST)
दिवाळीच्या फराळासाठी आपण खवाची, ओल्या नारळाची करंजी केली असेल आज आम्ही बेसनाची कारंजी कशी करायची सांगत आहोत चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या. 
साहित्य -
मैदा - 1 वाटी 
साजूक तूप -2 टेबल स्पून 
दूध - ¼ कप
 
सारणासाठी 
बेसन - 150 ग्राम  
पिठी साखर  - ½ कप
साजूक तूप - ¼ कप 
बादाम 
काजू 
किसलेले खोबरे  - २ टेबल स्पून
चारोळ्या - 1 टेबल स्पून
बेदाणे - 1 टेबल स्पून
 वेलची पूड  
साजूक तूप तळण्यासाठी
 
कृती- 
सर्वप्रथम एका भांड्यात मैदा घेऊन त्यात साजूक तूप वितळून घाला. थोडं दूध घालून पुरीच्या कणकेप्रमाणे मळून घ्या.आता ही कणिक 20 ते 25 मिनिट झाकून ठेवा. 
 
सारण तयार करण्यासाठी -
सर्वप्रथम बदाम आणि काजू बारीक चिरून घ्या. एका पॅन मध्ये तूप घालून बेसन परतून घ्या. बेसनाचा रंग बदलल्यावर त्यात कापलेले बदाम, काजू, बेदाणे किसलेलं खोबर, आणि वेलचीपूड घालून एकत्र मिसळून घ्या. हे सारण थंड होण्यासाठी ठेवा. सारण थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घालून चांगल्या प्रकारे मिसळून घ्या. सारण तयार. 
 
आता झाकून ठेवलेल्या कणकेला एकसारखं मळून घ्या. नंतर त्याचा लहान-लहान गोळ्या बनवून पुऱ्यांप्रमाणें लाटून घ्या. नंतर पुरी हातावर घेऊन करंजीच्या साच्यावर ठेवा त्याच्या मधोमध सारण भरा आणि कडेला दुधाचा हात लावून सर्व दुरून पुरी बंद करा.संचातून करंजी काढून ताटलीत झाकून ठेवा. अशा प्रकारे सर्व करंज्या तयार करून घ्या. 
आता कढईत तूप घालून तयार करंज्या मध्यम आंचेवर ठेऊन सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्या . अशा प्रकारे सर्व करंज्या तळून घ्या. चविष्ट बेसनाच्या करंज्या खाण्यासाठी तयार. करंज्या थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा.   
 
Edited By - Priya Dixit  
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती