दिवाळी विशेष : खुसखुशीत खमंग चकली रेसिपी

बुधवार, 23 ऑक्टोबर 2024 (12:44 IST)
साहित्य   
एक किलो तांदुळ 
एक मोठी वाटी चणा डाळ 
अर्धी वाटी मुगडाळ 
अर्थी वाटी ज्वारी आणि पोह्यांचे मिश्रण 
एक चमचा जिरे 
एक चमचा तीळ 
अर्धा चमचा धणे  
चवीनुसार मीठ 
एक चमचा तिखट 
तळण्यासाठी तेल 
 
कृती- 
खुसखुशीत खमंग चकली बनवण्यासाठी सर्वात आधी तांदुळ, मूग डाळ, चणा डाळ, पोहे, ज्वारी हे एकत्र करून भाजून घ्यावे. नंतर त्यामध्ये धणे व जिरे घालून हे सर्व मिश्रण दळून घ्यावे. आता दळलेल्या या मिश्रणाचे पीठ एका ताटात घेउन त्यामध्ये मीठ, तिखट, तीळ, थोडेसे तेल व गरजेपुरते कोमट पाणी घालावे व हे चांगल्याप्रकारे घट्ट मळून घ्यावे. तसेच चकली यंत्राच्या मदतीने चकली तयार करावी व   तेलात खमंग होइसपर्यंत तळावी. तर चला तयार आहे आपली दिवाळी विशेष खुसखुशीत खमंग चकली, गरम नक्कीच सर्व्ह करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती