धनत्रयोदशी आणि मीठ यांचे काय संबंध ?

शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2022 (16:31 IST)
धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ नक्कीच खरेदी करावे कारण धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेले मीठ घरात सुख-समृद्धी तर आणतेच, तसेच ऐश्वर्यही वाढतं. धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ विकत घेणार्‍या घरात देवी धनलक्ष्मीचा आशीर्वाद सदैव राहतो.
 
असे मानले जाते की या दिवशी मिठाचे नवे पाकीट खरेदी करून तेच नवीन मीठ स्वयंपाकात वापरावे, असे केल्याने घरातील प्रमुखाच्या संपत्तीचा ओघ वाढतो. आणि बाजारात सहज उपलब्ध असलेले हे मीठ तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासू देत नाही. याशिवाय मिठाच्या नवीन पॅकेट्सचा अनेक प्रकारे वापर करून तुम्ही घरात शुभता आणि संपत्ती वाढवू शकता.
 
धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केलेले मीठ काचेच्या भांड्यात किंवा लहान बाऊलमध्ये भरुन घराच्या ईशान्य कोपर्‍यात ठेवल्यास घरातील नकारात्मकता दूर होते, पैसे कमविण्याचे नवीन मार्ग देखील मिळतात.
 
धनत्रयोदशी ते दीपावली या दिवशी खरेदी केलेल्या मीठाने घरात पोछा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जाही दूर होते आणि घरात सुख, शांती, संपत्ती आणि वैभव वाढते.
 
एवढेच नाही तर धनत्रयोदशीच्या दिवशी मीठाचे पाकीट खरेदी करून तुम्ही कमी पैसे खर्च करून तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणता. या दिवशी मीठ खरेदी करणार्‍या व्यक्तीला आयुष्यात कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही आणि त्या घरावर देवी लक्ष्मी सदैव प्रसन्न राहते.
 
याशिवाय ऐश्वर्य मिळविण्यासाठी या दिवशी झाडू, अख्खे धणे, कवड्या, कमळगट्टा, हळदीच्या गाठी खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्याने, संपत्तीची देवी तुमची साथ कधीच सोडत नाही आणि नेहमीच अपार कृपा करत असते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती