भारतीय संघाने चौथ्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे. याआधी एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघ तीनदा अंतिम फेरीत पोहोचला होता. 1983 साली भारताने कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच विश्वचषक जिंकला होता. 2003 मध्ये सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विजयाची नोंद करण्यात अपयशी ठरला होता. पण 2011 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावले.
12 वर्षांनंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला पुन्हा एकदा विश्वचषक ट्रॉफीवर कब्जा करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय संघ सध्या जबरदस्त फॉर्ममधून जात आहे. भारतीय खेळाडू बॉल आणि बॅट या दोन्ही बाबतीत चांगली कामगिरी करत आहेत. अशा स्थितीत भारतीय संघ विश्वचषक जिंकण्याचा प्रबळ दावेदार असल्याचे दिसत आहे.