विश्वचषकाची फायनल भारत-पाकमध्ये?

गुरूवार, 5 फेब्रुवारी 2015 (11:45 IST)
सलग दुसर्‍यावेळा विश्वकप जिंकण्याची भारताला संधी असून भारत व पाकिस्तान यांच्यातच फायनल होण्याची दाट शक्यता असल्याचे मत माजी क्रिकेटपटूंनी व्यक्त केले आहे.
 
विश्वकप क्रिकेटवर सोमवारी आयोजित चर्चासत्रात पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल-हक, भारताचे माजी कर्णधार कपिल देव, माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर, दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज क्षेत्ररक्षक व भारताचा माजी सलामीवीर अरुण लाल यांनी आपले विचार मांडले. भारताला जेतेपद राखण्याची ६० ते ७० टक्के संधी आहे, असे मत इंझमामने व्यक्त केले. भारतीय संघ येथे बरेच दिवसांपासून आहे. त्यांना येथील वातावरणाचा सराव झाला असून त्याचा त्यांना लाभ मिळेल. भारताकडे रोहित, विराट व रैना यांच्यासारखे सामना जिंकून देणारे फलंदाज आहे, असे तो म्हणाला.

वेबदुनिया वर वाचा