वर्ल्ड कपामध्ये टीम इंडियाच्या यशाचे मूळ कारण

मंगळवार, 17 मार्च 2015 (15:04 IST)
दोन महिने अगोदर ऑस्ट्रेलियात पराभूत होणारी टीम इंडियाची सर्वदूर कठोर आलोचना होत होती आणि टेस्ट क्रिकेटहून अचानक संन्यास घेणारा संघाचा कर्णधार धोनीला फ्लॉप सांगणार्‍यांची कमी नव्हती.   
 
एकाही एक्सपर्टने टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकण्याचे दावेदार मानले नव्हते. पण आपल्या सर्व ग्रुप सामने जिंकून अभिमानाने क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा बनवणारी टीम इंडिया आज वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सर्वांची फेवरिट बनली आहे.   
 
झिंबाब्वेच्या विरुद्ध षट्कार लावून भारताला विजय मिळवून देणार्‍या कॅप्टन धोनीला आज सर्वजण बेस्ट म्हणत आहे, आपण जाणून घेऊ की कशा प्रकारे ऑस्ट्रेलियेत पराभूत होणारी टीम इंडिया अचानकच वर्ल्ड कापामध्ये चॅम्पियनसारखी खेळायला लागली, शेवटी काय आहे वर्ल्ड कापामध्ये टीम इंडिया आणि धोनीच्या यशाचे गुपित ..
 
1.  ऑस्ट्रेलियाचा लांब दौरा आणि धोनीची मुलगी  ! 
ऑस्ट्रेलियाच्या लांब दौर्‍यात टीम इंडियासाठी काहीच खरे ठरले नाही आणि टीमला एकही विजय मिळाला नाही. या लांबच्या दौर्‍यामुळे  खेळाडूंना फारच थकवून दिले होते. पण क्रिकेटच्या चांगल्या स्टूडेंटप्रमाणे माहीने या पराभवांकडून बरेच काही शिकले आणि त्यात सुधार करण्याचा प्रयत्न केला. तसेच वर्ल्ड कप सुरू होण्या अगोदर धोनीसोबत एक लेडी लक जुळून गेले जेव्हा त्याच्या बायकोने एका मुलीला जन्म दिला. धोनीची मुलगी जिवा त्याच्यासाठी फारच लकी ठरली आहे आणि आता ही बाब कोणाला सांगायची काहीच गरज उरलेली नाही आहे.  
 
पुढे पहा टीम इंडियाच्या जर्सीचे रंग बदलणे
2. टीम इंडियाच्या जर्सीचे रंग बदलणे : टेस्ट सिरींज संपल्यानंतर टीम इंडिया धोनीच्या फेवरिट लिमिटेड ओवर्स क्रिकेटमध्ये उतरली. टीमच्या जर्सीचे रंग बदलल्यामुळे टीमचे भाग्य ही बदलले. तसं तर ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या ट्राय सिरींजमध्ये टीम फेल झाली पण संघाने वर्ल्ड कपासाठी जरूरी वॉर्म अपचे काम केले आणि वर्ल्ड कपामध्ये टीम इंडिया जगातील सर्वात धोकादायक टीम बनली.  
 
3. मागच्या वर्ल्डकपचे चॅम्पियन होणे : वर्ल्ड चॅम्पियन होण्याची पूर्तता टीम इंडियाच्या खेळाडूंमध्ये हा भरवसा आणून देतो की ते परत चॅम्पियन बनू शकतात. दोन वर्ल्ड कप जिंकून चुकलेले धोनी तसे देखील वर्ल्ड कपामध्ये फलंदाजी असो किंवा कर्णधारपद सर्वात बेस्ट असतो.  
 
4. शानदार सुरुवात ! टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानवर जोरदार विजय मिळवून वर्ल्ड कप मोहिमेचे शानदार प्रदर्शन केले. या विजयामुळे टीम इंडियाचा मनोबल वाढला आहे. त्यानंतर तर टीम इंडिया समोर साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडीज सारखे संघ देखील टिकू शकले नाही. 
 
पुढे पहा दबावातून बाहेर निघण्याची धोनीची क्षमता
5. दबावातून बाहेर निघण्याची धोनीची क्षमता : ही कला कदाचित धोनीमध्येच आहे. स्वत:वर एवढा भरवसा फारच कमी खेळाडूंमध्ये दिसून येतो. वेस्ट इंडीजच्या विरुद्ध फलंदाजांचे फ्लॉप झाल्यानंतर त्याने संघाला विजय मिळवून दिली आणि झिंबाब्वेविरुद्ध दबावाच्या वेळेस रैनासोबत खेळलेला त्याचा डाव कोणीच विसरू शकणार नाही.  
 
6. धोनीची कप्तानीः धोनीने या वर्ल्ड कपामध्ये लागोपाठ 6 सामने जिंकून आकड्यांच्या हिशोबी स्वत:ला इंडियाचा बेस्ट कॅप्टन साबीत केले आहे. त्याच्या नावावर वर्ल्ड कपामध्ये लागोपाठ 10 विजयांचा रेकॉर्ड नोंदवण्यात आला असून तो सौरभ गांगुली (8 विजय) आणि क्लाइव लॉयड (9 विजय)हून पुढे निघाला आहे. आता त्याच्यापुढे फक्त पॉन्टिंग (24 विजय) आहे.  
 
7. गोलंदाजांचे उत्कृष्ट प्रदर्शन : टीम इंडियाचे गोलंदाजांनी या वर्ल्ड कपामध्ये आपल्या शानदार प्रदर्शनाने सर्वांना चकित केले आहे. ज्याला वर्ल्ड कपाआधी टीम इंडियाची कमजोरी म्हणण्यात येत होते, तिच त्याची सर्वात मोठी ताकद बनली आहे. ग्रुप सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांनी सर्व 6 संघांचे 10 विकेट घेऊन स्कोर 60 आऊट ऑफ 60 केला आहे. पर्फेक्ट बोलिंग!
8. टीम एकदुसर्‍याच्या यशाचा आनंद साजरा करते : धोनी फारच विनम्रतेने संघात एकदुसर्‍यांनी मिळवलेल्या यशा एन्जॉय करतो. संघाच्या विजयाचे क्रेडिट घेण्यासाठी तो स्वत:ला सर्वात मागे ठेवतो. तो म्हणतो की मी संघाच्या गरजेनुसार फलंदाजी करतो आणि याचा आम्हाला नक्कीच फायदा मिळतो.  
 
9. पुढे जाण्याची उत्साह : टीम इंडियात पुढे जाण्याचा उत्साह आणि वर्ल्ड कप जिंकण्याची भूक दिसून येत आहे. लागोपाठ सहा सामने जिंकणार्‍या संघाला क्वॉर्टर फायनलमध्ये बांगलादेशाविरुद्ध खेळून विजय मिळवायची आहे आणि हा विजय त्यांच्यासाठी फार अवघड नसेल. धोनीचे म्हणणे आहे की टीम योग्य लयमध्ये पुढे जात आहे आणि आम्ही याला असेच पुढे घेऊन जाऊ. आम्हाला ही तर हेच हवे आहे, ऑल द बेस्ट टीम इंडिया!!

वेबदुनिया वर वाचा