भारताविरुद्ध मी 'स्लेजिंग' करणारच - जॉन्सन

बुधवार, 25 मार्च 2015 (16:46 IST)
विश्वकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीपूर्वीच ऑस्ट्रेलियाने भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध  माईड गेम खेळण्यास सुरुवात केली आहे. या सामन्यामध्ये भारतीय खेळाडूंना 'स्लेजिंग'चाही सामना करावा लागणार आहे, असा इशाराच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने दिला. गेले चार महिने ऑस्ट्रेलियाच्या दौर्‍यावर असलेल्या भारताला विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी एकही विजय मिळविता आला नसल्याची आठवन करून देत ग्लेन मॅक्सवेलने माईंड गेमला तोंड फोडले होते. 
 
ऑस्ट्रेलियन संघामध्ये एरवी स्लेजिंगची जबाबदारी सलामीवर डेव्हिड वॉर्नरवर असते. स्पर्धेपूर्वीच्या भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये मात्र वॉर्नरने भारतीयांविरुद्ध तोंडाचा पट्टाही चांगलाच वापरला होता. आयसीसीच्या कडक नियमांमुळे आणि संघ व्यवस्थापनाच्या शिस्तीमुळे वॉर्नरने यांदाच्या स्पर्धेत मैदानावर स्लेजिंक केलेले नाही. 
 
विश्वकरंडक स्पर्धेत स्लेजिंगमध्ये गुंतणार नसल्याचे वॉर्नरने सांगितल्याचे मी ऐकले आहे. पण ही कामगिरी  कुणीतरी बजावली पाहिेजेच. 
 
त्यामुळे कदाचित ही जबाबदारी मला पार पाडावी लागू शकते. हा खेळाचाच एक भाग आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शेन वॉटसनविरुद्ध वहाब रिवाझने केलेली शेरेबाजीही असाच एक भाग होता. माझ्या मते, हा खेळाचा एक उत्कंठावर्धक भाग होता आणि अशाच अनेक घटना येत्या सामन्यातही घडतील. 

वेबदुनिया वर वाचा