'Yellow Fungus’ अधिक धोकादायक, जाणून घ्या लक्षणं

सोमवार, 24 मे 2021 (16:32 IST)
कोरोना आणि काळी बुरशी अर्थात म्युकोरमायकोसिस या दोन गंभीर आजारांचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोच व्हाइट फंगस या नव्या आजाराने डोकं वर काढल्याचं पाहायला मिळालं. पण आता Black Fungus व White Fungu नंतर नवं संकट समोर येऊन उभं ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. देशात यल्लो फंगस (Yellow Fungus) या नव्या आजाराने शिरकाव केल्याचं सांगण्यात येत आहे. 
 
उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये यलो फंगसचं पहिलं प्रकरण दिसून आलं आहे. 45 वर्षांच्या व्यक्तीला यलो फंगसचा संसर्ग झाला आहे. हा फंगस ब्लॅक आणि व्हाइडपेक्षाही यलो फंगस अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे.
 
कान-नाक-घसा तज्ज्ञ यांच्याप्रमाणे सीटी स्कॅनमध्ये 45 व्यक्तीचं सायनस सामान्य होतं. पण जेव्हा आम्ही एन्डोस्कोपी केली तेव्हा त्याला ब्लॅक, व्हाइट आणि यलो असे तीन प्रकारचे फंगल इन्फेक्शन असल्याचं समजलं.
 
यल्लो फंगसची लक्षणं
थकवा किंवा सुस्तपणा
कमी भूक किंवा भूक न लागणे
वजन कमी होणं
जखम बरी होण्यास वेळ लागणं
डोळे आत जाणं
शारीरिक हालचाली मंदावणे
 
ही यलो फंगसची लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसल्याच त्याकडे दुर्लक्ष करू नये. त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती