महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार

शनिवार, 20 फेब्रुवारी 2021 (21:54 IST)
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या  पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध उपाययोजना सुरू  केल्या असून, यानुसार राज्य सरकार महाराष्ट्रात पुन्हा एकदा नाईट कर्फ्यू लागू करण्याचा विचार करत आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याबाबतचे संकेत दिले आहेत.
 
वडेट्टीवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे जर स्थिती सुधारली नाही,तर महाराष्ट्रात संध्याकाळी 6 ते रात्री 8 पर्यंत नाइट कर्फ्यू लागू केला जाऊ शकतो.
 
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक यासारख्या शहरात कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.  राज्य सरकारकडून कोरोनाचे नियम पालन करा, असे आवाहन केले  मात्र सर्वसामान्य जनतेकडून हे नियम पायदळी तुडवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून नाईट कर्फ्यू लावण्याचा विचार केला जात आहे.
सर्वसामान्यांनी कोरोनाच्या गाईडलाईन्स पाळाव्यात, यासाठी अनेक ठिकाणी विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. सार्वजनिक ठिकाणी, लोकल ट्रेनमध्ये कोरोनाच्या गाईडलाईन्सचे पालन करावे, असेही सांगितले जात आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती