दुसऱ्या लाटेत ११ मार्च रोजी दिवसाला ९१,१०० कोरोना रुग्णांची भर पडत होती.हाच आकडा तिसऱ्या लाटेत मुंबईसाठी दिवसाला १ लाख ३६ हजार रुग्णांपर्यंत पोहोचू शकतो.पुण्यात १९ मार्च रोजी दिवसाला १.२५ लाख रुग्णांची नोंद झाली होती.तिसऱ्या लाटेत हीच संख्या तब्बल १.८७ लाख रुग्णांपर्यंत पोहोचू शकते.
तिसऱ्या लाटेच्या अंदाजात मुंबईत व्यक्त करण्यात आलेले शिखर हे १.३६ लाख रुग्णांचे आहे.यात ८८ हजार ८२३ रुग्णांना होम क्वारंटाइन, ४७ हजार ९२८ रुग्णांना रुग्णालयात आणि ९५७ रुग्णांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज भासू शकते.तर पुण्याच्या बाबतीत १.२१ लाख रुग्णांवर होम क्वारंटाइन आणि १३१४ रुग्णांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.ठाण्यातही तशीच काहीशी परिस्थिती असून तिसऱ्या लाटेत बाधितांची संख्या १.३ लाखांपर्यंत पोहोचू शकतो आणि ९११ जणांना अतिदक्षता खाटांची गरज भासू शकते.
यात ८५० जणांना अतिदक्षता विभागातील खाटांची गरज पडेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, तिसऱ्या लाटेत मुंबईला २५० मेट्रिक टन (एमटी) ऑक्सिजनची गरज भासू शकते. पुण्यात हाच आकडा २७० मेट्रिक टन इतका होऊ शकतो. ठाण्यात १८७ एमटी, नागपुरात १७५ एमटी व नाशिकला ११४ एमटी इतक्या ऑक्सिजनची गरज पडू शकते.