शाहुनगर येथील आदिती कटारे हिची भारतीय वायुसेनेत निवड झाली आहे. महिलांना सैन्य दलात भरती करून घेण्याबाबत अलीकडेच सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे.त्यानुसार येथून पुढे महिलांनाही एनडीएची परीक्षा देता येणार आहे.या निर्णयानंतर आदितीच्या वायुसेनेत झालेल्या निवडीमुळे पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अदिती ही मूळची चिंचवड परिसरातील शाहूनगर येथील रहिवासी आहेत.तिचं शालेय शिक्षण चिंचवड येथील कमलनयन बजाज शाळेत पूर्ण झालं आहे.यानंतर तिने आपलं महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील व्हीआयटीत पूर्ण केलं आहे.अभ्यासात अत्यंत हुशार असणाऱ्या अदितीनं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरींगची पदवी 80 टक्के गुणांसह मिळवली आहे.सध्या ती सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून एका खासगी कंपनीत कार्यरत आहे.