पिंपरीनंतर आता पुणे मनपातील बडा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात, प्रचंड खळबळ

मंगळवार, 24 ऑगस्ट 2021 (08:09 IST)
पिंपरी-चिंचवड महापालिकेत ( पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागानेसापळा रचून मोठी कारवाई केल्याच्या घटनेला आठवडा देखील पुर्ण झाला नाही तोवर लाचलुचतप प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (Anti Corruption Pune) पुणे महानगरपालिकेच्या उप अभियंत्याला 40 हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहेत. त्यामुळे पुण्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
सुधीर विठ्ठलराव सोनवणे (उप अभियंता, रस्ते विभाग,टिंगरेनगर, पुणे महापालिका) असे अ‍ॅन्टी करप्शनच्या सापळयात सापडलेल्या मनपाच्या अधिकार्‍याचे नाव आहे.अ‍ॅन्टी करप्शन विभागाने काही दिवसांपुर्वी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत सापळा रचून कारवाई केली होती.लाच प्रकरणी थेट स्थायी समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन लांडगे यांच्यासह त्यांच्या पीएला आणि इतर चौघांना अटक केली होती.सोमवारी अ‍ॅड.नितीन लांडगे यांचा अंतरिम जामिन मंजूर झाला आहे.पिंपरी मनपातील लाच प्रकरण ताजे असतानाच पुणे महानगरपालिकेच्या उप अभियंत्याला अ‍ॅन्टी करप्शनने 40 हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे.सुधीर सोनवणे हे पुणे मनपाच्या रस्ते विभागात कार्यरत होते.उप अभियंत्याला 40 हजार रूपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
पुणे लाचलुचतप प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ,अप्परअधीक्षक सुरज गुरव ,अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा ,उप अधीक्षक श्रीहरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास अ‍ॅन्टी करप्शनचे अधिकारी करीत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती