राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६६ टक्क्यांवर

गुरूवार, 6 ऑगस्ट 2020 (09:20 IST)
राज्यात  दिवसभरात ६१६५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर १०,३०९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख ५ हजार ५२१ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६५.२५ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४५  हजार ९६१  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी येथे दिली.
 
पाठविण्यात आलेल्या २४ लाख १३ हजार ५१० नमुन्यांपैकी ४ लाख ६८ हजार २६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४० टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ४३ हजार ६५८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ४६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३३४  करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ टक्के एवढा आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती