राज्यात प्रथमच नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक

मंगळवार, 28 जुलै 2020 (10:49 IST)
राज्यात प्रथमच सोमवारी कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त नोंदविली गेली असून ८ हजार ७०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ७ हजार ९२४ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार ९४४ झाली आहे. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५७.८४ टक्के आहे.  सध्या १ लाख ४७  हजार ५९२  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
 
पाठविण्यात आलेल्या १९ लाख २५ हजार ३९९ नमुन्यांपैकी ३ लाख ८३  हजार ७२३ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख २२ हजार ६३७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार १३६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २२७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६२ टक्के एवढा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती