कोरोना रूग्णांची संख्या वाढल्याने चिंता वाढली

शुक्रवार, 27 ऑगस्ट 2021 (15:37 IST)
पुन्हा कोरोनाने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.मुंबईत आता 397 रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, आता ऐन सणासुदीत कोरोना पुन्हा परतण्याची भीती व्यक्त होत आहे. यामुळे कोविड नियम पाळण्याचे मुंबई महापालिकेने आवाहन केले आहे. तर दुसरीकडे गणेशोत्सव आणि दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबतच साजरी करावी लागणार आहे,असा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिला आहे. 
 
28 जुलैला मुंबईत 404रूग्णांची नोंद झाल्यानंतर, मुंबईतल्या रूग्णांची संख्या कमी होत गेली. मात्र,गुरुवारी पुन्हा एकदा रूग्णवाढ झाल्याचे पाहायला मिळाली.दिवसभरात 397 रूग्णांची नोंद झाली असून,7 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे, पुन्हा एकदा मुंबईकरांची चिंता वाढली आहे.ऐन सणासुदीच्या तोंडावर रूग्णवाढ होत असल्याने यंदाही सणांवर कोरोनाचे सावट आहे. 
 
कोरोनाचा धोका वाढत असल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा इशारा दिला आहे. यंदाही गणेशोत्सव, दसरा-दिवाळी कोरोना नियमांसोबतच साजरा करावा लागेल,असे म्हटले आहे.त्यामुळे सणासुदीच्या काळात काळजी घेण्याची आवश्यकता आहेत.तशा सूचना आरोग्य मंत्रालयाने केल्या आहेत.लसीकरण झाल्यानंतरही मास्क आणि कोरोना नियम पाळणं गरजेचे आहे, असे म्हटले आहे. दरम्यान, केरळसह महाराष्ट्रात रात्रीच्या संचारबंदीची सूचना करण्यात आल्या आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती