ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना कोरोना

मंगळवार, 8 सप्टेंबर 2020 (08:40 IST)
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर  उपचार सुरु आहे. ठाण्यात आतापर्यंत १३० अधिकाऱ्यांसह १ हजार ३१२ पोलीस कोरोनाबाधित झालेले असून त्यापैकी १ हजार १०० पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत.
 
ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दोन दिवसांपासून खोकला आणि ताप येत असल्यामुळे त्यांनी रविवारी कोरोनाची तपासणी केली. या तपासणीमध्ये ते पॉझिटिव्ह आढळल्यामुळे ते मुंबईतील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण चांगले असून प्रकृतीही स्थिर आहे. 
 
परप्रांतीयांची घरवापसीसाठीही त्यांनी वैयक्तिक पातळीवर लक्ष दिले होते. मुंब्रा तसेच भिवंडीसारखा संवेदनशील परिसरही त्यांनी पिंजून काढला होता. पोलिसांमध्ये वाढते कोरोनाचे प्रमाण लक्षात घेता त्यांनी सर्वच पोलीस ठाण्यांमध्ये काही सामाजिक संस्थांच्या मदतीने कोरोना तपासणी आणि उपचाराची मोहीम राबविली होती. ७० दिवस रुग्णलायत राहून कोरोनाशी लढा देत घरी सुखरूप परतलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा घरी ठाणे पोलीस आयुक्त फणसाळकर यांनी नुकतीच भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती