राज्यात उच्चांकी कोरोना रूग्णांची वाढ, ४ दिवसांपासून सतत मोठी वाढ

सोमवार, 7 सप्टेंबर 2020 (08:41 IST)
दिवसभरात राज्यात रविवारी उच्चांकी 23 हजार 350 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 328 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून कोरोना रुग्णांचा आकडा सतत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. 
 
रविवारी एका दिवसात राज्यात 7,826 रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाख 44 हजार 440 इतकी झाली आहे. राज्यातला रिकव्हरी रेट 71.03 टक्के आहे.
 
राज्यात आतापर्यंत एकूण 9 लाख 7 हजार 212 कोरोना रुग्ण आढळले आहेत. सध्या महाराष्ट्रात 2 लाख 35 हजार 857 ऍक्टिव्ह रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 
 
राज्यात आतापर्यंत एकूण 26 हजार 604 जणांचा कोरोनामुळे बळी गेला असून सध्याचा राज्यातील मृत्यूदर 2.93 टक्के इतका आहे. 
 
राज्यात आतापर्यंत 46,47,742 चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी 9, 07, 212 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या 14,96,72 जण होम क्वारंटाईनमध्ये असून 38,509 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 
 
दरम्यान, रविवारी सलग चौथ्या दिवशी कोरोनाग्रस्तांची संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. 3 सप्टेंबरला राज्यात 18 हजार 105 कोरोनाबाधित आढळले होते. 4 सप्टेंबरला 19 हजार 218 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. तर 5 सप्टेंबर रोजी 20 हजार 489 नव्या कोरोना रुग्णांचं निदान झालं होतं. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती